ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोयनेचे पाणी राज्यासाठी राखीव ठेवा; आ. शूभंराज देसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोयनेचे पाणी राज्यासाठी राखीव ठेवा; आ. शूभंराज देसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शहर : सातारा

कोयना नदीचे पाणी कर्नाटकाला न देता ते राज्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार देसाईंनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली. कोयना धरणामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा कमी असल्याने तो कर्नाटकाला देण्यात येऊ नये, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
आतापर्यंत देण्यात आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी देण्यात येऊ नये. अद्याप राज्यात मॉन्सूनच्या आगमनाला महिन्याभराचा कालावधी आहे. त्यामुळे हा पावळ्यापर्यंत पुरेल का नाही याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. कोयना धरण पाटण तालुक्यात असले तरी या तालुक्यात पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केल्याचे देसाई यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच नदीकाठी वसलेल्या गावांनाही कोयना नदीतून पाणीपुरवठा करण्यात येत असून शेतीसाठीही याच पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.ं

मागे

पाकिस्तानची नौटंकी उघड; एअरस्ट्राइकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानची नौटंकी उघड; एअरस्ट्राइकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा

इंडियन एअरफोर्सने  26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्....

अधिक वाचा

पुढे  

राहुल गांधींना सुप्रिम कोर्टाचा दिलासा
राहुल गांधींना सुप्रिम कोर्टाचा दिलासा

राहुल गांधींच्या विरोधातील दुहेरी नागरिकत्वाची याचिका सुप्रिम कोर्टाकडू....

Read more