ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हेच का आपले प्रजासत्ताक ? केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलं असतं तर….

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 26, 2021 07:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हेच का आपले प्रजासत्ताक ? केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलं असतं तर….

शहर : मुंबई

आज 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. पण कोरोनाच्या या जीवघेण्या संसर्गामुळे आजच्या दिवसावरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावर आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील सरकारने एक पाउल मागे घेतले असते तर आज राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आला आहे.

‘नोटाबंदी, जीएसटी आणि लाँकडाउन यामुळे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातही आक्रोश आहेच. रशियासारख्या पोलादी देशातील जनताही तेथील राजवटीच्या विरोधात माँस्कोच्या रस्त्यावर उतरलीच, हे समजुन घ्यायला हवे. आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्यराज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहेत. हे चित्र बरे नाही, उद्या हा वणवा आणखीही पसरु शकतो. हे खरेच प्रजासत्ताक आहे का ?’ असा थेट सवाल करत कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनावरून केंद्राच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होणार आहे. पण यावरही कोरोनाचं सावट असणार आहे. एकीकडे चीनच्या कुरापतींचं सावट असणार आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा आक्रोष आणि तणावदेखील असणार आहे. यामुळे दिल्लीच्या सोहळ्यावर याचा मोठा परिणाम जाणवेल असं सामनातून लिहिण्यात आलं आहे. यावेळी सामनातून कोरोनामुळे आजच्या कार्यक्रमावर होणाऱ्या परिणामांवरही लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, ज्या पद्धतीने कोरोनाचा परिणाम अद्याप कायम आहे. तसेच ज्या जनतेचे हे ‘प्रजासत्ताक आहे त्या जनतेचे अनेक प्रश्न 72 व्या प्रजासत्ताक दिनीही कायमच आहेत. मागील सात दशकांत देशाची प्रगती नक्कीच झाली. त्या प्रगतीचे लाभ जनतेलाही झालेच, पण ते किती लोकांना झाले? कोणत्या वर्गाला झाले? असा थेट सवाल शिवसेनेकडून केंद्राला विचारण्यात आला आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावरही टीका करण्यात आली आहे. ‘‘करोडपतींचीही संख्या वाढली, पण गरीब अधिक गरीब झाला हेदेखील खरेच. देशातील शेतकरी आणि सामान्य जनता जेथे सुखी आणि सुरक्षित असते तो देश खरा प्रजासत्ताक म्हणता येतो. आपल्या देशाला खरेच तसे म्हणता येईल का? पुन्हा या प्रश्नांची उत्तरे ज्यांनी द्यायची ते नेमके अशा प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. त्यांच्या ‘मन की बातमध्ये हे ज्वलंत मुद्दे येत नाहीत.’ अशी टीका करण्यात आली आहे.

मागे

अभिमानास्पद… गडचिरोलीच्या 12 पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर
अभिमानास्पद… गडचिरोलीच्या 12 पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक जाहीर झाले असून सर्व....

अधिक वाचा

पुढे  

हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा : सिंधुताई सपकाळ
हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा : सिंधुताई सपकाळ

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असले....

Read more