By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 06:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे एसटीचे ब्रीदवाक्य. त्यानुसार गेली 7 दशके प्रवाशांची वाहतूक करीत आहे. परंतु अलीकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी प्रशासनाने 'कंत्राट पद्धतीवर 'शिवशाही' सुरू केली आहे. परंतु या 'शिवशाही'च्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी मात्र कमालीचे त्रस्त झालेले दिसत आहेत.आता गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या भाविकांना या शिवशाहीचा फटका बसला आहे.
याचेच एक उदाहरण. गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या भाविकानी बोरीवलीहून सुटणार्या बोरीवली कोल्हापूर शिवशाही गाडीचे आरक्षण केले होते. बोरिवलीहून कोल्हापूरकडे जाणारी शिवशाही बस 8.45 वाजता सुटेल अशी वेळ तिकीटावर होती. ही गाडी साधारणपणे सांताक्रूझला 9.30 ते 9.45 पर्यंत येणे अपेक्षित होते. पण 11 वाजून गेले तरी गाडी आली नाही. शिवाय ही गाडी येणार की नाही येणार, किती वेळ लागेल? याची कोणतीच सूचना एसटी प्रशासनाकडून किंवा बोरीवली डेपो कडून दिली गेली नाही. इतकेच काय पण या गाडीच्या प्रवाशांनी एसटी प्रशासन आणि बोरीवली स्थानकात संपर्क साधला, पण संपर्क होत नव्हता. संपर्क झाला तर उत्तरही कोणी देत नव्हते. अखेर काही प्रवासी कुर्ला स्थानकात गेले तेथे ही गाडी रात्री 1 वाजता पोहोचली.
मी दयानंद मोहिते शिवशाही च्या 6 तिकिट्स बुक केल्या आहे. गाडीची वेळ आहे 9.45 नॅन्सी कॉलनी ते कोल्हापूर आता रात्रीचे 12 वाजले आहेत मी 3 तासापासून संपर्क करण्याचा प्रयन्त करत आहे मला काहीही रिस्पॉन्स मिळत नाहीये. मी पत्नी आणि 3 लहान मुली आहे.शिवशाही चा हा भोंगळ कारभार आहे.@DRaote pic.twitter.com/Ez6UALzGBO
— Garja Hindustan (@garja_hindustan) September 1, 2019
आधीच 'शिवशाही'च्या प्रवासाबद्दल प्रवाशांत नाराजी आहे. कारण 'शिवशाही'चे होणारे अपघात, चालकांचा बेदरकारपणा यामुळे शिवशाहीकडे प्रवासी पाठ फिरवीत आहेत. अशातच गाडीला विलंब होत असेल आणि त्याची कोणतीच आगावू सूचना मिळणार नसेल तर एसटीच्या या 'शिवशाही'तून प्रवास का करावा, असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला आहे.
काल पासून भाविक गणेशमूर्ती आपआपल्या घरोघरी, सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी ने....
अधिक वाचा