By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करताना उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती हरपल्याची त्यांनी भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 73 व्या परिषदेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज य....
अधिक वाचा