By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे येथे अतिवृष्टीने महापूर आला आहे.साहजिकच तेथून येणारे सुमारे 13 लाख लिटर दुधाचा पुरवठा घटला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पाणी साचले असल्याने वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यामुळे दूध संकलन ही ठप्प आहे. साहजिकच असंख्य मुंबईकरांचा दूधाविना काळा चहा प्यायची वेळ आली आहे. मुंबईसह कोकणातही महाड चिपळून रत्नागिरीला दुधाचा पुरवठा झालेला नाही. अजूनही कोल्हापूर-सांगली भागात बचावकार्य सुरू आहे. हजारो कुटुंबे बेघर झाले आहेत. अशा स्थितीत दुधाचा पुरवठा होत नाही. शिवाय पुरवठा करणे अवघड झाले आहे या स्थितीत सुधारणा होण्यासाठी आठवडा जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आस असलं तरी सारं काही पावसावर अवलंबून आहे
मुंबईसह राज्यातील सरकारी आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 4500 निवासी ....
अधिक वाचा