ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Ram Mandir : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2020 10:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Ram Mandir : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात

शहर : देश

अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.

या द्वारेच संबंधित व्यक्तीला भूमिपूजनाच्या ठिकाणि प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. चार पेक्षा जास्त लोकांना बंदी आहे. या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. दीपोत्सवासाठी  शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आला आहेत.

 

मागे

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलं....

अधिक वाचा

पुढे  

"बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान", सामनातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

अयोध्येतील राम मंदिराचे आज (5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमी....

Read more