By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 02:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दादर प्रभादेवीयेथील गोखले रोडवरील जाखादेवी मंदिराजवळील आरक्षित भूखंडावर महापालिका 8 मजली इमारत उभारून त्यातील 6 मजले सिद्धीविनायक व्यासाला आरोग्यसेवेसाठी भाडेतत्वावर देणार आहे. या जागेत न्यासातर्फे गरीब रुग्णांना प्राथमिक आरोग्यसेवेसह डायलेसिस केंद्र उभारण्यात येणार आहे.
सिद्धीविनायक न्यासाला भाडेतत्वावर जागा देण्यासाठी काल सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या दालनात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपायुक्त (आरोग्य) सूनिल धामणे आदि अधिकारी उपस्थित होते.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जाखादेवी मंदिराजवळील हा भूखंड प्रसूतिगृह व दवाखान्यासाठी राखीव आहे. हा भूखंड आरोग्य सेवेसाठी मिळावा यासाठी सिद्धीविनायक न्यास प्रयत्नशील होता. मात्र संपूर्ण भूखंड देण्यास पालिकेने नकार दिला. आता या भूखंडावर पालिका 8 मजली इमारत बांधणार आहे. इमारतीचा तळमजला, पहिला व दूसरा मजला यावर पालिकेतर्फे आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूतिगृह असणार आहे. तसेच विविध रक्त तपासण्या व चाचण्याही घेण्यात येणार आहेत. तिसर्या मजल्यापासून 8 व्या मजल्यापर्यंत सिद्धीविनायक न्यासातर्फे आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. यात गरीब रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व अन्य चाचण्याची सेवा दिली जाणार आहे.
हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची ओदिशा तटावर घेण्या....
अधिक वाचा