ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

होम क्वारंटाईन केलेल्या चौघांचा रेल्वेने प्रवास; बोरिवली स्थानकातून घेतले ताब्यात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 03:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

होम क्वारंटाईन केलेल्या चौघांचा रेल्वेने प्रवास; बोरिवली स्थानकातून घेतले ताब्यात

शहर : मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना वारंवार देऊनही नागरिकांकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली रेल्वे स्थानकात गुरुवारी याचा प्रत्यय आला. सिंगापूरमधून परतल्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या सहा प्रवाशांना आज ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करत होते. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटली. मात्र, यामध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यानंतर सौराष्ट्र एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात थांबवण्यात आली. यानंतर या सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवण्यात आले.

त्यामुळे नागरिक अजूनही कोरोनासारखी घातक समस्या गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कालच मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आलेले चार जण आढळून आले होते. तिकीट तपासनीसाला यांच्या हातावरचा होम क्वारंटाईनचा शिक्का दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर या चौघांना पालघर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले होते.

राज्यात गुरुवारी कोरोनाचे आणखी रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबई, उल्हासनगर आणि नगरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. नगरमधील रुग्ण ३ मार्चला तीन मार्चला दुबईहून परतला होता. तर मुंबईतील २२ वर्षीय तरुणी ही ब्रिटनहून आली होती. उल्हासनगरमधील ४९ वर्षीय महिला दुबईहून आली होती. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ पर्यंत पोहोचली आहे.

 

मागे

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 48 वर, मुंबईतील 2 महिला, नगरमधील एकाला लागण
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 48 वर, मुंबईतील 2 महिला, नगरमधील एकाला लागण

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 48 वर पोहोचला आहे. मुंबईतील दोन महिलां....

अधिक वाचा

पुढे  

निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या
निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका गुरु....

Read more