ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात गेल्या २४ तासांत ५३ हजार ६०१ कोरोनाबाधित, ८७१ जणांचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात गेल्या २४ तासांत ५३ हजार ६०१ कोरोनाबाधित, ८७१ जणांचा मृत्यू

शहर : देश

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ५३ हजार ६०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे. भारत आता कोरोना मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ इतकी झाली आहे. त्यापैकी लाख ३९ हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १५ लाख ८३ हजार ४९०  रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४५ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्याप्रमाणे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना २८.२१ टक्के आहे. तर या  धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.८० टक्के असून  मृत्यू झालेल्यांचे प्रमाण .९९ टक्के आहे.

 

मागे

रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार? व्हायरल बातमीवर रेल्वे मंत्रालय म्हणाले...
रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार? व्हायरल बातमीवर रेल्वे मंत्रालय म्हणाले...

30 सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशी एक बातमी....

अधिक वाचा

पुढे  

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; वडिलांच्या संपत्तीत मुलींना...
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; वडिलांच्या संपत्तीत मुलींना...

सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी अतिशय महत्त्वाचा निर्णय देत साऱ्या देशाचं ....

Read more