ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 09:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त

शहर : मुंबई

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील या उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम २० एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर, या काळात वाहनचालकांना उड्डाणपुलाखालील रस्ता हा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध असेल. सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईमार्फत करण्यात आले होते. तर, आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठका पार पडल्या. उड्डाणपुलाला एकूण १७० बेअरिंग असून दोन महिन्यांच्या कालावधीत ते बदलण्यात येणार आहे. या कालावधीत उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ण बंद करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास असल्याने काम होईपर्यंत पुलावरील वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविले आहे.
 

मागे

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ आग
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ आग

मुंबई - घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेकडील गेस्ट हाऊसजवळ टॉप टेन मोबाईल....

अधिक वाचा

पुढे  

माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या
माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमधील शेतकऱ्यानं आत्महत्या केली.....

Read more