ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2021 01:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू

शहर : देश

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस रस्त्यावरुन जात असताना वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन वीजप्रवाह संपूर्ण गाडीत पसरला. त्यामुळे बसच्या क्लीनरचा आणि ड्रायव्हरसह सहाजणांचा दुर्दैवी अंत झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालोरच्या महेशपूर गावात ही घटना घडली. या बसमध्ये बरेच प्रवाशी होते. रस्ता चुकल्यामुळे ही बस महेशपूर गावानजीक पोहोचली. त्याठिकाणी ड्रायव्हरला रस्त्यावर एक वीजेची तार लोंबकळताना दिसल्यामुळे बस थांबवण्यात आली. तेव्हा क्लीनर बसच्या टपावर चढला आणि त्याने एका काठीच्या मदतीने वीजेची तार वर उचलून धरली.

त्यानंतर ड्रायव्हरने बस पुढे नेली. मात्र, तेव्हा क्लीनरच्या हातातली काठी सटकल्यामुळे वीजेची तार त्याच्या गळ्यात येऊन अडकली. क्लीनर बसच्या छतावर उभा असल्यामुळे वीजप्रवाह संपूर्ण बसमध्ये पसरला. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना वीजेचा झटका बसला. त्यानंतर वीजप्रवाहामुळे बसमध्ये आगही लागली.

बसचा चालक आणि क्लीनरचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत पोलिसांनी बसमधून काही मृतदेह बाहेर काढले आहेत. बसमध्ये आणखी काही मृतदेह असल्याची शंका आहे. तर जखमींवर जोधपूरच्या एमडीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे-एक्स्प्रेस वेवर ट्रेलरला आग, जीवितहानी नाही

रायगड: मुंबई-पुणे-एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजजवळ ट्रेलरला लागली आग लागली आहे. पुणे आज पहाटे ही घटना घडली आहे. ही घटना घडताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून येथील वाहतूक पुन्हा सुऱळीत झाली आहे.

मागे

सावधान! KYC च्या नावाने ग्राहकांची फसवणूक, SBI बँकेचा मोठा इशारा
सावधान! KYC च्या नावाने ग्राहकांची फसवणूक, SBI बँकेचा मोठा इशारा

देशात सायबर क्राईम ही समस्या पोलिसांठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हॅकर....

अधिक वाचा

पुढे  

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले
कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच; मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव....

Read more