ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

त्रिपक्षीय करारातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपांची लागवड

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 02:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

त्रिपक्षीय करारातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपांची लागवड

शहर : मुंबई

त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्यंत  राज्यात ४३४.१४९ हेक्टर वन जमीनीवर जवळपास 6 लाख रोपांची लागवड झाली आहेअशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

अनेक स्वंयसेवी संस्थासामाजिक तसेच औद्योगिक संघटनांना वृक्षलागवड करण्याची इच्छा असतेत्यांच्याकडे निधी असतो परंतू त्यांच्याकडे जागा नसते. त्यांचीही गरज लक्षात घेऊन संबंधित स्वंयसेवी संस्था आणि वन विभाग यांच्यात  सात वर्षांसाठी त्रिपक्षीय करार केला जातो. यात वन विभागाची जमीन संबंधित संस्थेला सात वर्षाकरिता वृक्षलागवडीसाठी उपलब्ध करून दिली जाते. तिथे ही  संस्था वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करते व सात वर्षांनंतर हे विकसित झालेलं वन वन‍ विभागाकडे पुन्हा हस्तांतरीत करते. अशा पद्धतीने राज्याचं हरित क्षेत्र वाढण्यास मदत तर होतेच परंतू वृक्षलागवडीत योगदान देऊ इच्छिणाऱ्यांना ही आनंद प्राप्त होतो. ते यासाठीचा संपूर्ण खर्च उचलतात. मागील पाच वर्षात साधारणत: असे २४ करार करण्यात आले. यातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपे लागली तर संबंधित संस्थांनी यासाठी त्यांचा ९ कोटी २७ लाख ९४ हजार ३५७ रुपयांचा निधी खर्च केला. अशा पद्धतीने राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करणारं महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे, अशी माहिती ही वनमंत्र्यांनी दिली. 

मागील काही वर्षात राज्यात हरियालीसॅमसोनाईट कंपनीदौंड शुगर प्रा. ‍लिकरोला रिअल्टी पुणेबुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्हि क्रेडिट सोसायटीयुनायटेड वे ऑफ मुंबईसुप्रिया फार्म प्रा.लिमे. जिंदाल स्टील लि.साऊथ एशिया प्रा.लिठाणे-बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन नवी मुंबईदीपक फर्टीलायझरर्स,लॉईडस् मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.,ग्रींड मास्टर मशिन्स प्रा. लिस्पॅन फुडसश्री. गजानन महाराज संस्थान शेगांवमे. कमिन्स इंडिया फाऊंडेशनमर्सिडिज बेंझ इंडिया प्रा. लि.प्रयासमोरडे फुडस्  प्रा.लि.गायत्री परिवार अशा नामवंत स्वंयसेवीऔद्योगिक संघटनांनी वन विभागाशी करार करून राज्यात वन फुलवण्याचे काम केले आहे.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणालेया औद्योगिक संस्थांकडेकंपन्यांकडे मोठ्याप्रमाणात सामाजिक दायित्व निधीची उपलब्धता असते. ज्या कंपन्या त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्षलागवडीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना वृक्षलागवडीच्या कामात सहभागी करून घेतले जाते तसेच ज्या कंपन्या केवळ आपला सामाजिक दायित्व निधी देऊ इच्छितात त्यांना विविध ठिकाणी होणाऱ्या वृक्षलागवडीची माहिती देऊन त्यासाठी त्यांचे वित्तीय सहाय्य घेतले  जाते, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

मागे

अभय योजना 2019 अंतर्गत 3 हजार 500  कोटी रुपयांचा कर भरणा - सुधीर मुनगंटीवार
अभय योजना 2019 अंतर्गत 3 हजार 500  कोटी रुपयांचा कर भरणा - सुधीर मुनगंटीवार

वस्तू आणि सेवा कर विभागाने अंमलात आणलेल्या अभय योजना 2019 अंतर्गत विवादित कर,&nb....

अधिक वाचा

पुढे  

दुधासाठी प्रती लीटरला 140 रुपये
दुधासाठी प्रती लीटरला 140 रुपये

पाकिस्तानमध्ये महागाईमुळे सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. येथे केव....

Read more