ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 07:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती

शहर : मुंबई

राज्य पोलीस सेवेतील १६ अधिकाऱ्यांना आयपीएस संवर्ग पदोन्नती मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केलेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अखिल भारतीय पोलीस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य पोलीस सेवेतून भरल्या जातात. त्यासाठी प्रत्येक राज्य आपल्या राज्याच्या कोटय़ानुसार पात्र उमेदवारांचे प्रस्ताव केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवतात. त्यानंतर लोकसेवा आयोग पात्र उमेदवारांची निवड करून अंतिम यादी केंद्र सरकराला कळवते. राज्य पोलीस सेवेत अधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची आयपीएस पदोन्नती होते.

आयपीएस पदोन्नती झालेल्यांची नावे

एस. जी. वायसे पाटील, . एम. बारगळ, एन. टी. ठाकूर, एस. एल. सरदेशपांडे, नितीन प्रभाकर पवार, डी. पी. प्रधान, एम. एम. मोहिते (शीला डी सैल), पांडुरंग पाटील, टी.सी दोशी, डी.बी पाटील(वाघमोडे) एस.एस. बुरसे, सुनीता साळुंखे- ठाकरे, एस. एन.परोपकारी, एस. एस. घारगे, रवींद्रसिंग परदेशी आणि पुरुषोत्तम कराड यांची निवड झाली आहे.

मागे

'नीट'चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आत्महत्या ...
'नीट'चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आत्महत्या ...

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने नि....

अधिक वाचा

पुढे  

आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर
आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर

आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान....

Read more