By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यावर टीका होत आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री असताना स्मृती इराणी या बलात्कार प्रकरणावर गप्प का?, असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जातोय.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्कार पीडितेचा मंगळवारी (29 सप्टेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर उत्तर प्रदेश सरकार तसेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका होत आहे. “हाथरस बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी काहीच प्रतिक्रिया का देत नाहीत? काँग्रेसच्या सत्ताकाळात स्मृती इराणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करायच्या. पण आता त्या शांत आहेत का आहेत?. सत्तेत नसताना बलात्कारासारखे मुद्दे त्यांना गंभीर वाटायचे? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगा आदित्यनाथ यांच्याकडे त्या राजीनामा का मागत नाहीत?”, असे अनेक प्रश्न त्यांना सोशल मीडियावर विचारले जात आहेत.
स्मृती इराणी यांचे आंदोलन करतानाचे जुने व्हिडिओ आणि ट्वीट्सही व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसवर टीका करत बलात्काऱ्यांना फाशीची देण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओंचा आधार घेत, “विरोधी पक्षात असताना त्यांची मुलींविषयीची कळकळ दिसायची, पण तीच माया आता का दिसत नाही?, असंही नेटकऱ्यांकडून त्यांना विचारलं जातंय.
हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ची स्थापना करण्य....
अधिक वाचा