ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आता रेल्वेप्रवास आणखी सोपा, IRCTC च्या ‘या’ सुविधेमुळे समजणार रेल्वेची अचूक वेळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2020 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आता रेल्वेप्रवास आणखी सोपा, IRCTC च्या ‘या’ सुविधेमुळे समजणार रेल्वेची अचूक वेळ

शहर : देश

रेल्वेचा प्रवास हा सर्वांत सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रेल्वेनेच प्रवास करण्याकडे नागरिकांचा जास्त ओढा असतो. मात्र, रेल्वेच्या उशिराने येण्यामुळे नागरिकांना रेल्वे प्रवास कधीकधी कंटाळवाना वाटतो. तसेच, हिवाळा सुरु असल्यामुळे कित्येक तास रेल्वेस्थानकावर थंडीत कुडकुडुत उभं राहावे लागणार असल्यामुळेही प्रवासी रेल्वेने प्रवास करण्याचे टाळतात. प्रवाशांचा हाच त्रास कमी होण्यासाठी उत्तर रेल्वेने एसएमएसची सुविधा सुरु केली आहे. एखादी रेल्वेगाडी उशिराने येणार असेल, तर तशी माहिती या एसएमएसद्वारे रेल्वे विभागाकडून देण्यात येणार आहे.

एसएमएसची सुविधा कशासाठी?

कोरोना महामारीमुळे गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या कारणामुळे देखील उत्तर रेल्वे प्रशासनाने ही एसएमएसची सुविधा सुरु केली आहे. तसेच, एखादी रेल्वेगाडी उशिराने येणार असेल तर प्रवाशांना रेल्वेस्थानकार ताटकळत बसावे लागू नये म्हणूनही ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

एसएमएस कसा पाठवला जाणार?

उत्तर रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर आशुतोष यांनी या एसएमएसच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आपला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल. एखादी रेल्वेगाडी उशिराने येणार असेल, तर त्याची माहिती या मोबाईल नंबरवर दिली जाईल. या सुविधेमुळे प्रवाशांना रेल्वेस्थानकावर येऊन बसण्याची गरज पडणार नाही. तसेच, कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावरील गर्दीही कमी होईल.

कोरोनामुळे रेल्वे विभागाकडून आणखी काय खबरदारी ?

कोरोना महामारीमुळे गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच, रेल्वेस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी खबरदारी म्हणून वेगवेगळे उपायही करण्यात येत आहेत. उत्तर रेल्वे विभागाने सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा रक्षक ठेवण्यात आलेले आहेत. तसेच, रेल्वे रुळावर गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना जीपीएसवर आधारित उपकरणं दिले आहेत. रेल्वेरुळावर कुठलाही उपघात झाल्यास त्याची माहिती देणे या उपकरणामुळे सोपे होणार आहे. तसेच, रेल्वेंमध्ये प्रवाशांसाठी जेवणाची, वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची व्यवस्थाही सरकारने केली आहे.

व्हिजिबलिटी टेस्ट

सध्या हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे सकाळी रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर धुकं जमा होतं. या धुक्यामुळे उपघात होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानक आणि आसपासच्या परिसरात व्हिजिबलिटी टेस्ट केली जाते. तसेच, रेल्वे पायलटला अशा परिस्थितीत रेल्वे चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात येते. या प्रशिक्षणामुळे रेल्वे रुळावरील धुकं आणि इतर कठीण परिस्थितींमध्ये रेल्वेगाडी चालवणे सोपे होते.

फॉग सेफ्टी डिव्हाईस

रेल्वे रुळांवर धुकं जमा झाल्याने रेल्वे पायलटला रेल्वेगाडी चालवणे कठीण होऊन बसते. प्रवाशांना सुपरुप सोडण्याचे त्याच्यासमोर आव्हान असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वेंना फॉग सेफ्टी डिव्हाईस लावले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने आगामी रेल्वेस्थानकांशी संपर्क करण्यास मदत होते. तसेच, या उपकरणामुळे दृष्यमानता कमी असली तरी, रेल्वे रुळ व्यवस्थित दिसण्यास मदत होते.

मागे

स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त, नव्या कोरोनाची धास्ती
स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त, नव्या कोरोनाची धास्ती

स्कॉटलंडहून आलेल्या नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त आढळला आहे. या घटनेमुळे नाशि....

अधिक वाचा

पुढे  

हम नही सुधरेंगे! नाईट कर्फ्यूतही पार्सल सेवा, दारुची दुकानं सुरुच
हम नही सुधरेंगे! नाईट कर्फ्यूतही पार्सल सेवा, दारुची दुकानं सुरुच

लंडनमध्ये (Coronavirus) कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्यानंतर आणि सध्याच्या कोरोनाची ....

Read more