By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 12:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
धारावी डेपो जवळ सोनेरी चाळीत राहणारी तहसीन खान ( वय 18) आणि तिची आई सुल्ताना खान (वय 34) या दोघींना घरात सापाने दंश करताच तोच साप घेऊन त्या दोघी सायन रुग्णालयात पोहचल्या. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी 11 च्या सुमारास तहसीन कुटुंबियांसह नाश्ता करीत होती. त्यावेळी घरात शिरलेल्या सापाने तिला दंश केला. तेव्हा सुल्तानाने त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच सापाने तिच्याही हाताला दंश केला. त्याही अवस्थेत सापाला त्यांनी सोडले नाही. साप घेऊन त्यांनी टॅक्सी पकडली आणि सायन रुग्णालय गाठले. साप कोणत्या जातीचा आहे. हे ओळखून योग्य उपचार व्हावेत यासाठी जीवंत सापाला घेऊन आल्याचे त्यांनी डॉक्टरला संगितले. तथापि, साप कोणत्याही जातीचा असो त्यावरील उपचाराची पद्धत सारखीच असते, असे डॉक्टर प्रमोद इंगोळे यांनी संगितले.
लाहोरपासून 400 किमी अंतरावरील सादीकबादचे 330 किलो वजन असलेले रहिवासी नोरुळ हसन....
अधिक वाचा