ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...म्हणून बीसीसीआयने धोनीला करारातून वगळले 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 03:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...म्हणून बीसीसीआयने धोनीला करारातून वगळले 

शहर : मुंबई

          मुंबई - बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसोबतच्या वर्षभरासाठीच्या कराराची घोषणा काल (१६ जानेवारी) केली. मात्र या करारामधून धोनीचं नाव वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने उचलेल्या या पावलामुळे धोनी आता टीम इंडियासाठी खेळू शकणार का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. करारबद्ध करणं आणि धोनीच्या भविष्याचा काहीही संबंध नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


       दरम्यान, धोनी चांगली कामगिरी करुन पुन्हा एकदा भारतीय टीममध्ये येऊ शकतो. करार करणं म्हणजे भारताकडून खेळणं असा त्याचा अर्थ होत नाही. भारताकडून नियमित खेळणाऱ्या खेळाडूंसोबत करार करण्यात आला आहे, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. धोनी हा वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शेवटचा खेळला होता. जुलै महिन्यात ही मॅच झाली होती. यानंतर धोनी भारताकडून खेळला नाही, त्यामुळे त्याचं नाव करारबद्ध खेळाडूंमध्ये नाही, असं ते म्हणाले. बीसीसीआयने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंत खेळाडूंशी करार केला आहे. 


          आता धोनी आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, तसंच इतर विकेट कीपरचा फॉर्म कसा असेल, यावर धोनीची टी-२० वर्ल्ड कपमध्ये निवड होईल का नाही, हे ठरवलं जाईल, असं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. दरम्यान, आयपीएल मोठी स्पर्धा आहे. आयपीएल संपल्यानंतर टी-२० वर्ल्ड कपमध्ये कोण खेळणार, हे स्पष्ट होईल, असं शास्त्रींनी सांगितलं होतं. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
 

मागे

निर्भया: राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने अखेर मुकेश सिंहला फाशी होणार
निर्भया: राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने अखेर मुकेश सिंहला फाशी होणार

       नवी दिल्ली - निर्भया प्रकरणात फाशीसाठी दोषी ठरविण्यात  आलेल्या ....

अधिक वाचा

पुढे  

२६ जानेवारीला हल्ल्याचा कट रचणा-या ५ दहशतवाद्यांना अटक   
२६ जानेवारीला हल्ल्याचा कट रचणा-या ५ दहशतवाद्यांना अटक   

      नवी दिल्ली - श्रीनगरमधील हजरतबल भागातून ५ दहशतवाद्यांना जम्मू-कश्म....

Read more