By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले तरी जेथून राज्याचा कारभार चालवला जातोय तेच मंत्रालय हॉटस्पॉट ठरताना दिसून येत आहे. आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह आले असून मंत्रालय आता कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागला आहे. यापूर्वी अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. तर मंत्री कार्यालयातील अनेक कर्मचारी आणि इतर कर्मचारीही कोरोना पॉझीटीव्ह आढळू लागले आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, सुनील केदार, नितीन राऊत, हसन मुश्रीफ, अस्लम शेख, विश्वजित कदम, संजय बनसोडे, बच्चू कडू, अब्दुल सत्तार यांना कोरनाची लागण होऊन गेली आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि नितीन राऊत यांच्या कार्यालयातील प्रत्येकी ५ ते ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने यांची मंत्रालयातील कार्यालये काही दिवस बंद ठेवण्यात आली होती.
काही अधिकारी कोरोनाची लागण झाल्याने घरी असून काही जण होमक्वारंटाईन आहेत. आधीच मंत्रालयात कर्मचारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती कमी असते, त्यात अनेक कर्मचारी, अधिकारी पॉझिटिव्ह येऊ लागल्याने त्याचा परिणाम मंत्रालयातील कामावर होत आहे.
मोदी सरकारने काल (23 सप्टेंबर) कामगार विधेयकं मंजूर केली. एकीकडे शेती विधेयका....
अधिक वाचा