ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन त्यांना शिष्यवृत्ती द्या, धनंजय मुंडेंचा आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2021 10:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन त्यांना शिष्यवृत्ती द्या, धनंजय मुंडेंचा आदेश

शहर : मुंबई

कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन अशा पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत.(Dhananjay Munde offers great relief to Scheduled Caste and Buddhist students)

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास आर्थिक सहाय्य मिळावे या दृष्टीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या विविध योजना सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविल्या जातात. राज्यातील बहुतांश महाविद्यालयात सध्या कोविडमुळे विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत. २०२०-२१ या वर्षी नूतनीकरणासह नवीन अर्ज महाविद्यालय स्तरावरुन सामाजिक न्याय विभागाकडे सादर करताना ज्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष हजेरी ७५% असते, अशाच विध्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाचे प्राचार्य, पोर्टलवरून सामाजिक न्याय विभागाकडे सादर करू शकतात.

‘ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरली जाणार

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोविड -१९ च्या स्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थिती देणे शक्य नव्हते, ही अडचण लक्षात घेऊन कोविड-१९ चा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून, त्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटलं आहे.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन आदी योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना देय असलेली रक्कम त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून मंजूर करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिल्यामुळे, या योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागे

Costal Road : वरळीतील ‘लोटस जेट्टी’बाबत स्थानिक मच्छिमारांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Costal Road : वरळीतील ‘लोटस जेट्टी’बाबत स्थानिक मच्छिमारांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

कोस्टल रोडच्या कामात अडथळा आणणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्....

अधिक वाचा

पुढे  

सरकार कविता राऊतला नोकरी देऊ शकत नसेल तर काही तरी गडबड, राज्यपालांची ठाकरे सरकारवर टिप्पणी
सरकार कविता राऊतला नोकरी देऊ शकत नसेल तर काही तरी गडबड, राज्यपालांची ठाकरे सरकारवर टिप्पणी

“आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनि....

Read more