ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोशल मीडिया कायद्याच्या कक्षेत येणार, सुप्रीम कोर्टाची ट्विटर, फेसबुकला नोटीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 06:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोशल मीडिया कायद्याच्या कक्षेत येणार, सुप्रीम कोर्टाची ट्विटर, फेसबुकला नोटीस

शहर : देश

सोशल मीडियाही कायद्याच्या कक्षेत येणार आहे. व्हायरल होणारा भडकावू मजकूर आणि खोटय़ा बातम्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने सोमवारी या याचिकेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारसह ट्विटर, फेसबुक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावली.

याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम् यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने केंद्र सरकारसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. याचिकेत केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय, कॉर्पोरेट मंत्रालय, दूरसंचार मंत्रालय, ट्विटर कम्युनिकेशन, फेसबुक इंडिया आदींना प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

भडकावू व्हायरल मजकूर, खोट्या बातम्यांवर अंकुश आणण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सोशल मीडियातील भडकावू मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळांतच आपोआप डिलीट होती अशी प्रणाली सरकारने कार्यान्वित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार, दूरसंचार मंत्रालय, कॉर्पोरेट मंत्रालय,  ट्विटर कम्युनिकेशन, फेसबुक इंडियाला म्हणणं मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याचिकेतील मागण्या

-व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह, भडकावू मजकुराबाबत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सऍप या सोशल नेटवार्ंकग साईटस्ना जबाबदार धरा

सोशल मीडियातील भडकावू मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळांतच आपोआप डिलीट होतील, अशा प्रकारची प्रणाली सरकारने कार्यान्वित करावी.– जबाबदार लोकांविरोधात फौजदारी खटला चालवण्यासाठी सरकारने स्वतंत्र कायदा बनवावा.

 

मागे

लोकलमधून इतक्या लाख प्रवाशांचा प्रवास, रेल्वेला इतक्या कोटींचं उत्पन्न
लोकलमधून इतक्या लाख प्रवाशांचा प्रवास, रेल्वेला इतक्या कोटींचं उत्पन्न

दहा महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर नियम व अटींसह सर्वसामान्यांसाठी लोकल स....

अधिक वाचा

पुढे  

दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत
दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत

दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने ती....

Read more