ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोळंकी कुटुंबाने मुलीची पाठवणी चक्क शेणाने सारवलेल्या गाडीतून केली

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोळंकी कुटुंबाने मुलीची पाठवणी चक्क शेणाने सारवलेल्या गाडीतून केली

शहर : कोल्हापूर

             कोल्हापूर - सगळीकडे लग्नाची धुमधम सुरू आहे. लग्नाची वरात थाटामाटात निघावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र कोल्हापुरात काही वेगळचं घडले. एका पित्याने आपल्या मुलीला सासरी पाठवण्यासाठी चक्क आपली गाडी शेणाने सारवली. डॉक्टर नवनाथ दुधाळ यांच्या या कल्पकतेने पाहुणे मंडळीही भारावून गेली. 

             उस्मानाबाद येथील नवनाथ दुधाळ यांच्या मुलीचा लग्नसोहळा कोल्हापुरातील सोळंकी कुटुंबात झाला. लग्नाचा मांडव सजला, सनईचे सूर ऐकत नातेवाईक मांडवात येत होते. मात्र आत शिरताना अनोख्या पद्धतीने सजलेली एक कार वऱ्हाडी मंडळींचं लक्ष वेधून घेत होती. शेणाने सारवलेली ही गाडी लग्नाच्या मांडवात काय करतेय, हा प्रश्न सर्वांना पडलेला. कुणी नाक मुरडलं, तर कुणी नाक मुठीत धरून गाडीपासून दूर पळालं.

             दरम्यान, पेशाने डॉक्टर असलेले नवनाथ दुधाळ हे ‘पंचगव्य’च्या माध्यमातून देशी गाईच्या शेणाच्या प्रचाराचं काम करत आहेत. आपलं काम फक्त उपदेश देण्यापुरतं नाही, तर कृतीतूनही दिसलं पाहिजे हा त्यांचा आग्रह. म्हणूनच त्यांनी देशी गाईच्या शेणाने सारवलेली गाडी मांडवात आणून लावली.

             कॅन्सरसारख्या अनेक भयानक आजारांनी माणसाच्या आयुष्याचा ताबा घेतला आहे. औषधांच्या अतिवापरामुळे जीवनमान कमी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक रोगावर जालीम उपाय असणाऱ्या देशी गाईच्या शेणाचा प्रसार करण्याची संधी दुधाळ परिवाराने या निमित्ताने साधली.

              इतर मुलींना फुलांनी सजलेल्या गाडीतून निरोप दिला जातो, पण शेणाने सजवलेल्या गाडीतून जाण्याचं भाग्य मला लाभल्याचं नववधू निकिता दुधाळ आनंदाने सांगते. औषधांविना निरोगी आयुष्य जगवण्याचं काम लग्नानंतरही करणार असल्याचे तिने बोलून दाखवले. 

              डॉ. दुधाळ आलिशान गाडीतून सजावटीसाठी लाखोंचा खर्च करुन मुलीची पाठवणी करु शकले असते. मात्र निरोगी आणि पर्यावरणपूरक आयुष्य जगण्याचा संदेश त्यांना देता आला नसता. शिवाय शेणाने सजवलेली गाडी किती सुंदर दिसते, हे पाहुणे मंडळीना लग्नातली हटके गोष्ट इतरांना सांगण्याची संधी मिळाली. 
 

पुढे  

वृद्धांना छळणाऱ्यांना  आता कायद्याने होणार कठोर शिक्षा
वृद्धांना छळणाऱ्यांना आता कायद्याने होणार कठोर शिक्षा

            मुंबई - ज्येष्ठ नागरिकांना किंवा कुटुंबातील वयोवृद्ध पालका....

Read more