By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2020 02:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2020) सोमवारी पाहायला मिळणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी खास ठरणार आहे. 2020 मधील पहिले सूर्यग्रहण 21 जून रोजी झाले होते. तर आता शेवटचे सूर्यग्रहण आज म्हणजे 14 डिसेंबरला लागणार आहे. जवळपास पाच तास हे सूर्यग्रहण चालेल. या पार्श्वभूमीवर धर्मशास्त्रानुसार काही गोष्टींचे भान राखणे अत्यंत गरजेचे आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणकाळात सूर्याशी संबंधित गोष्टींवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हा काळ अशुभ मानला जातो. आजचे सूर्यग्रहण हे जगातील अनेक भागांमध्ये दिसेल. कृषी, व्यापार आणि राजकारणावर याचा अप्रत्यक्ष प्रभाव पडेल. मात्र, भारतात हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नाही.
सूर्यग्रहणाचा कालावधी कोणता?
आज संध्याकाळी 7.04 वाजता सूर्यग्रहणाला प्रारंभ होईल. मध्यरात्रीच्या सुमारास हे ग्रहण सुटेल. भारतासाठी हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे. खंडग्रास सूर्यग्रहणात सूतक लागत नाही. मात्र, जे ग्रहणकाळातील चालीरिती पाळतात त्यांनी या काळात जेवण, प्रवास आणि कोणतेही नवे कार्य हाती घेऊ नका.
वृश्चिक राशीत ग्रहण
यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण वृश्चिक राशीत होत आहे. पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण मिथुन लग्न राशीतही प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
वृश्चिक राशीत पाच ग्रह
आजच्या सूर्यग्रहणाच्यानिमित्ताने एक विशेष घटना घडणार आहे. या काळात वृश्चिक राशीत चंद्र, बुध, केतू, शुक्र आणि सूर्य पाच ग्रह असतील. त्यामुळे अशुभ योग निर्माण होत आहे. याशिवाय, गुरू चांडाळ योग ही तयार होत आहे. त्यामुळे ग्रहणकाळात चांगल्या गोष्टी घडणार नाहीत.
‘या’ राशींवर पडणार सूर्यग्रहणाचा प्रभाव
सूर्यग्रहणाच्या काळात तूळ, मेष, मकर, मिथुन, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून ग्रहणामुळे तुमच्या जीवनात अशुभ घटना घडणार नाहीत. या काळात कोणतेही नवे कार्य हाती घेऊ नका. गायत्री मंत्राचा जप करावा. तसेच ग्रहणकाळात कोणाशी भांडू नका अथवा कोणताही वाद ओढावून घेऊ नका.
कंकणाकृती आणि खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय ?
कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्रबिंबाचा आकार लहान असल्याकारणाने सूर्य संपूर्ण झाकला जात नाही. चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब (म्हणजे सूर्यबिंबामध्ये पूर्णपणे मावू शकेल एवढा) आला की होणार्या सूर्यग्रहणाला कंकणाकृती म्हणतात.
ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सुर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंड-ग्रास म्हणतात. (कंकणाकृती हे देखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो.)
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात आज शेतकऱ्यांचं सिघु बॉर्डरवर ए....
अधिक वाचा