By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 12:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : वाशिम
रिसोड तालुक्यातील खडकी धांगोरे येथील जिजेबा खडसे यांनी आपल्याकडील ' सोन्या' नावाच्या बोकडाची 15 लाख रुपयांना विक्री करणार असल्याचे म्हटले आहे. या बोकडाला हैद्राबाद येथील एका ग्राहकाने 11 लाख 75 हजार रुपयांना मागणी केली आहे. या बोकडाच्या किमतीत स्कोर्पियो गाडी खरेदी करता येईल . स्कॉर्पिओ गाड्यांची किमत 10 ते 17 लाखांपर्यंत आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की , जिजेबा खडसे यांच्या शेळीने 2 वर्षा पूर्वी दोन शेरडांना जन्म दिला त्यातील 'सोन्या' नावाच्या बोकडाच्या डोक्यावर जन्मत:च अर्ध चंद्राची खूण आहे. अशी खूण असलेल्या बोकडाच्या कुर्बानीला मुस्लिम धर्मात विशेष महत्व आहे. अशा बोकडाची किमत लाखाच्या पटीत असते. 'सोन्या' बरोबरच्या दुसर्या बोकडाची जिजेबांनी 10000 रुपयांना विक्री केली. पण 'सोन्या'साठी मात्र 15 लाखाची किमत त्यांनी उभारली आहे.
कुंभारखनी येथील कोळसा खाणीतील गॅस लिक झाल्याने राजकुमार सिंह आणि गुड्डू ....
अधिक वाचा