ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गणेशोत्सव 2019 : रत्नागिरीसाठी विशेष रेल्वे

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 12:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणेशोत्सव 2019 : रत्नागिरीसाठी विशेष रेल्वे

शहर : मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भक्तांकरिता कोकण रेल्वे मार्गावर खास गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांचे आगावू आरक्षण झाल्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेवून लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी पर्यंत 30ऑगस्ट, 31ऑगस्ट व 1 सप्टेंबर दरम्यान विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे क्रमांक 01227 आणि 01228 लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी दरम्यान रेल्वे सुरू कराण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01227 रत्नागिरीसाठी एलटी मार्ग येथून आज 30 ऑगस्टला रात्री 8.50 वाजता सुटेल ती दुसर्‍या दिवशी सकाळी 6.40 वाजता रत्नागिरीत पोहोचेल. तर 01228 ही रत्नागिरीहून 31 ऑगस्टला सकाळी 8 वाजता सुटेल आणि दुपारी 4.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावई, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एकूण 24 डबे असतील. त्यात 1 टू टायर एसी, थ्रि टायर एसी 3 डब्बे. 14 डब्बे स्लीपर , 4 जनरल डब्बे आणि एसएलआरचे 2 डब्बे असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

मागे

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था
कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था

गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असंख्य चाकरमानी खास बाप्पासाठी वि....

अधिक वाचा

पुढे  

आता फक्त  हिंदू कर्मचारीच कार्यरत
आता फक्त हिंदू कर्मचारीच कार्यरत

आंध्रप्रदेशात स्थित असलेल्या व सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून फक्त भारतात नव....

Read more