By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 07:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाले होते. देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते ज्यामध्ये अनेकांचा बळी गेला होता. देशात अजूनही असुरक्षित स्थिती आहे. त्यामुळे श्रीलंकेने भारताची मदत मागितली आहे. श्रीलंका सरकारने भारत सरकारकडे एनसीजी (नॅशनल सिक्योरिटी गार्ड) पाठवण्याची मदत मागितली आहे. भारताचं हे विशेष पथक वर्दळीच्या ठिकाणी यशस्वी ऑपरेशन करण्यासाठी ओळखलं जातं.भारतात श्रीलंका किंवा इतर कोणत्याही देशात आपले सैनिक पाठवण्याचा नियम नाही आहे. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे पुढे येत श्रीलंकेपुढे मदतीचा हात केला होता. त्यानंतर श्रीलंकेने भारताकडे ही मदत मागितली आहे. श्रीलंका सरकारच्या अनौपचारिक आग्रहानंतर चेन्नईमध्ये एनएसजी कमांडोची एक टीम देखील तयार करण्यात आल्याची माहिती आहे. जर सहमती झाली तर एनएसजीची टीम कोलंबोमध्ये जावू शकते.श्रीलंकेच्या सुरक्षा रक्षकांनी मटुगमा-वेलिपेन्नामधून दहशतवादी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात दारु गोळा जमा केला आहे. श्रीलंकेवर सध्या दहशतवादी हल्ल्य़ाचं सावट आहे.
ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत 44 जणांना अटक केली असून यामध्ये 7 महिलांचा समावेश आहे. यामध्ये फातिमा लतीफा ही दहशतवादी मोहम्मद युहैम सादिक हकची पत्नी आहे. या शिवाय जहरान हाशिमची पत्नी फातिमा कादिया हिला देखील अटक करण्यात आली आहे.
दुष्काळामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र चारा आणि पाणीटंचाईचा सामना....
अधिक वाचा