By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 06:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chirmiri
पालम तालुक्यातील पेंडू (बू.) येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान रामदास शिवदास धुळगुंडे (32) हे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता गडचिरोली येथे शहीद झाले. यामुळे पेंडूसह परिसरातील गावावर शोककळा पसरली असून नक्षलवाद्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहीद जवान रामदास धुळगुंडे हे 2010 मधे राज्य राखीव दलात सहभागी झाले होते. त्यांना लहानपणापासून देशसेवा करण्याची आवड होती. यातूनच प्रचंड मेहनतीनंतर त्यांनी राज्य राखीव दलात प्रवेश मिळवला. मागील काही दिवसांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील बोरीपली येथे कार्यरत होते. येथेच गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांना वीरमरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ, दोन बहीणी असा त्यांचा परिवार आहे.
कश्मीरमध्ये सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद....
अधिक वाचा