ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

शहर : सातारा

कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने एका शाळकरी विद्यार्थिनीने गळफास आत्महत्या केली आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ती दहावीत शिक्षण घेत होती. तिच्या वडिलांचा 2007 मध्ये मृत्यू झाला होता. वडिलांचे छत्र हरपल्यापासून तिची आई, ती स्वत: तिच्या भावासह कष्ट करुन उदरनिर्वाह करत होते.

कोरोनामुळे संपूर्ण जग थांबलं. सरकारी कार्यालयं, खासगी कंपन्या वगैरे सुरु झाल्या असल्या तरी खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.मात्र ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थिनीकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती. मोबाईल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. त्यामुळे तिला अभ्यासाचा तणाव आला होता. काल (29 सप्टेंबर) दुपारी तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान या घटनेनंतर ओंड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मागे

Babri Masjid Demolition : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 28 वर्षात नेमकं काय घडलं?
Babri Masjid Demolition : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 28 वर्षात नेमकं काय घडलं?

सीबीआयचं विशेष न्यायालय 1992 च्या मुघलकालीन बाबरी विध्वंसप्रकरणी (babri masjid demolition) आ....

अधिक वाचा

पुढे  

Babri Case | बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त
Babri Case | बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्....

Read more