By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अखेर बहुप्रतिक्षित दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेतील निकालावर समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाने दुसऱ्या दिवशीपासूनच गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे.
निकालातील गुणांची पडताळणी करु इच्छिणाऱ्या किंवा आपल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच 30 जुलैपासून गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिका छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विभागाकडे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज विद्यार्थी स्वतंत्रपणे करु शकतात आणि विद्यार्थ्यांच्यावतीने शाळा देखील हा अर्ज करु शकतात.
गुणपडताळणीच्या अर्जाची मुदत
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 जुलैपासून ते 8 ऑगस्टपर्यंत असणार आहे. तर छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंतची मुदत असेल.
अर्जाचं शुल्क कसं भराल?
गुणपडताळणी किंवा छायप्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क भरता येणार आहे. यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करता येईल.
गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं बंधनकारक असणार आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यलयीन कामाच्या 5 दिवसांमध्ये गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे. तसेच www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.
मार्च 2020 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीच्या केवळ दोनच संधी असणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.
दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 ट....
अधिक वाचा