By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 10:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला आणणारा एसएससी बोर्डाचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षा निकाल आज (बुधवार 29 जुलै) दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात मार्च 2020 मध्ये ही परीक्षा पार पडली होती.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध होईल.
‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार
– राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी
– गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या 65 हजार 85 ने वाढली आहे
– संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी 4 हजार 979 परीक्षा केंद्रे होती
– एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी
– राज्यात 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा
– पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
– यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुले व 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत.
– राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली.
– एकूण 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
निकाल कसा पाहाल ?
कोविड रुग्णालयांमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र वारंवार स....
अधिक वाचा