ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोल्हापूर - प्रत्येक सीटच्या मध्यभागी पडदा पाच महिन्यानंतर आजपासून लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे.

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2020 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोल्हापूर - प्रत्येक सीटच्या मध्यभागी पडदा पाच महिन्यानंतर आजपासून लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे.

शहर : मुंबई

राज्यात आजपासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. परंतु राज्यातील अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी एखाद-दुसरा प्रवासी एसटीमधून प्रवास करत असल्याचं चित्र आहे.

पंढरपूर - कोरोनाच्या भीतीने प्रवाशांची बसकडे पाठ

राज्य सरकारने आजपासून आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरु केल्यानंतर कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी बस सेवेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आज सकाळीपासून बहुतेक बस मोकळ्याच सोडण्यात आल्या. गेल्या पाच महिन्यापासून एसटी बसची आंतरजिल्हा सेवा बंद होती, त्यामुळे आजपासून बाहेर जिल्ह्यात जाणारे प्रवासी गर्दी करतील अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र आज सकाळपासून एखादा प्रवासी वगळता प्रवाशांनी बस प्रवास टाळल्याचे दिसत आहे. आज पहिला दिवस असल्याने प्रवासी नसले तरी हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास प्रशासनाला वाटत असला तरी सध्या मात्र लालपरी मोकळीच धावात आहे.

वाशिम - आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी

गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या लालपरीला म्हणजे एसटीला आंतरजिल्हा प्रवासाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र वाशीममधून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी असल्याचं चित्र आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात एक एसटी बस धावणार आहे. मात्र प्रवासी संख्या वाढल्यावर जादा बस सोडल्या जाणार आहेत

कोल्हापूर - प्रत्येक सीटच्या मध्यभागी पडदा

पाच महिन्यानंतर आजपासून लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे. कोल्हापूर बस स्थानकावर वेगळंच नियोजन केलेली बस पाहायला मिळाली. या बसमध्ये प्रत्येक सीटच्या मध्यभागी एक पडदा बांधण्यात आला आहे. म्हणजे एका प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशासोबत कुठलाही संपर्क येऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आलं आहे.

हिंगोली - डेपोतून सोडलेली पहिलीच बस विना प्रवासी धावली

जिल्ह्याबाहेर वाहतूक सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आज हिंगोली आगारातून परभणीच्या दिशेने पहिली बस धावली आहे. मात्र प्रवासी नसल्याने ही बस विनाप्रवासी धावली आहे. वाहक आणि चालक दोघेच बसमधून परभणीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने एसटी बससेवा सुरु करणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन एसटी डेपो आहेत. कळमनुरी डेपोमधून देखील विविध ठिकाणी अकरा बस सुरु करण्यात आल्या आहेत.

-पासची गरज नाही

गणेशोत्सवानिमित्त आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा -पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी -पास लागू राहणार आहे.

 

मागे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही दाभोळकरांचा पर
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही दाभोळकरांचा पर

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्....

अधिक वाचा

पुढे  

प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या; बाथटबमध्ये आढळला मृतदेह
प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या; बाथटबमध्ये आढळला मृतदेह

बुधवारी संध्याकाळी माटुंगा येथे राहणारे 41 वर्षीय प्रसिद्ध चित्रकार राम का....

Read more