By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 10:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे, यामध्ये अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलतीचा यात समावेश आहे.
ग्रामीण भागातील मुलींची महाविद्यालयीन शिक्षणातील गळती रोखण्यासाठी त्यांना 12 वी पर्यंत मोफत प्रवास सवलत देण्यात येत आहे. या योजनेत 10 वी पर्यंत 19.54 लाख विद्यार्थीनी तसेच 12 वी पर्यंत 24 लाख विद्यार्थीनी लाभ घेत आहेत. विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा एसटी प्रवास सवलत योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही सवलत 66.67 टक्के आहे. सध्या या योजनेचे 44 लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे 50 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.
ज्येष्ठांना सवलती
65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी एसटी प्रवास सवलत सर्वसाधारण व निमआराम बसेसमध्ये 50 टक्के इतकी लागू होती. आता वातानुकुलित शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये 45 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचे सध्या 70 लाख लाभार्थी आहेत.
रूग्णांना सवलती
क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सिकलसेलग्रस्त, हिमोफीलीया आणि एचआयव्हीबाधित रुग्ण यांना 100 टक्के प्रवास सवलत देण्यात येते. 100 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास 50 टक्के प्रवास सवलत होती. आता रेल्वेप्रमाणे 65 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये दिव्यांग आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येते. शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात 70 टक्के सवलत देण्यात येते. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात 45 टक्के सवलत देण्यात येते.
दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र ते निवासस्थान या दरम्यान प्रवासासाठी 66.67 टक्के सवलत देण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ ही नवी योजना सुरु करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येईल. यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येईल.
बीड मध्ये काल प्रेमळ सासूच्या पार्थिवाला चार सुनानी खांदा दिल्याचे अनोखे द....
अधिक वाचा