ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटीने कर्मचाऱ्यांच्या एलआयसीचा हप्ता चुकवला? चार महिन्यांपासून हप्ता न भरल्यांचा कर्मचाऱ्यांचा आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 08:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटीने कर्मचाऱ्यांच्या एलआयसीचा हप्ता चुकवला? चार महिन्यांपासून हप्ता न भरल्यांचा कर्मचाऱ्यांचा आरोप

शहर : मुंबई

एसटी महामंडळात मागील 4 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे हफ्ते कट होत आहे परंतु ते एलआयसीकडे जमा झालेच नाहीत. त्यामुळे अनेकांना पॉलिसी लॅप्स होत असल्याचे मेसेज येत आहेत. कामगार संघटनांच्या माहितीनुसार तब्बल 2 कोटी रुपये महामंडळाने जमा केले नाहीत. त्यामुळे याकाळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई एसटी महामंडळ कुठून करणार असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे.

 एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पॉलिसी लॅप्स?

मागील 4 महिन्यांपासून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पॉलिसीचे हफ्ते एसटी महामंडळाने भरलेच नाहीत असा आरोप एसटी कामगार संघटनांनी केलाय. त्यामुळे अनेकांना पॉलिसी लॅप्स होत असल्याचे मेसेज देखील येत आहेत. याशिवाय भविष्यनिर्वाह निधीचे देखील हफ्ते जात नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहेमहाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेच्या माहितीनुसार मागील 4 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पॉलिसीचे पैसे तर पगारातून  कापण्यात येत आहेत. परंतु ती रक्कम एलआयसीकडे मात्र भरण्यात आली नाही. धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम 2 कोटींच्या आसपास आहे.

पॉलिसीचे हफ्ते एसटी महामंडळाने एलआयसीकडे भरणं बंद झाल्यापासून म्हणजे मागील 4 महिन्यांत एसटी महामंडळात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 100 ते 150च्या आसपास आहेत्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कुठून भरपाई मिळणार असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे. एसटी महामंडळाने आत्तापर्यंत 239 मृत कर्मचाऱ्यांपैकी केवळ 9 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये विम्याची रक्कम दिली आहे. त्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांचं काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.

 या संपूर्ण प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. कर्मचाऱ्यांचे पॉलिसीचे पैसे भरणं, भविष्यनिर्वाह निधीचा हफ्ता देणं या बाबी गंभीर असून याप्रकरणी सरकारने नेमलेल्या आयएएस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  केली आहे. याबाबत एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता एसटी महामंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली की, मागील काही महिन्यांपासून एसटीचं उत्पन्न बंद असल्यामुळे रक्कम जाऊ शकली नाही. परंतु याबाबत आता एसटीच्या मुख्यालयाकडे पैशांची मागणी केली असून पुढील 2 दिवसांत ही रक्कम एलआयसीच्या खात्यात जमा होणार आहे.

एसटी महामंडळाकडून पुढील 2 दिवसांत एलआयसीची रक्कम वर्ग करणार असल्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे खरंच ही रक्कम जमा होणार का की पुन्हा कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार हे येणारा काळचं ठरवेल.

 

 

 

मागे

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करु द्या; प्रवाशांची मागणी, मनसेचा पाठिंबा
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेने प्रवास करु द्या; प्रवाशांची मागणी, मनसेचा पाठिंबा

ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकलने, मेट्रोने प्रवास करण्....

अधिक वाचा

पुढे  

लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले 5 महिन्यात 40 लाख रुपये
लॉकडाऊनमुळे फी न भरता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापिकेने जमवले 5 महिन्यात 40 लाख रुपये

फी साठी विद्यार्थ्यांना तगादा लावणाऱ्या शाळांच्या  अनेक तक्रारी पाहायला....

Read more