ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 18, 2020 09:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

शहर : मुंबई

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला.

एसटी बंद असल्याने उत्पन्न रखडलं, त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाणार आहे.

सरकार एकीकडे नोकरीवरुन काढू नका म्हणत असताना एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.

जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. ज्यांचं प्रशिक्षण सुरु आहे, त्या कर्मचाऱ्यांचंही प्रशिक्षण थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे.

                                  

एसटीच्या पत्रकात काय म्हटलं आहे?

सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी.

भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे

चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, ते सुद्धा थांबवावे

मागे

पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई
पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई

पुण्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे.कोरोनाला आटोक्यात आणण्य....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार
पुण्यात कोरोनाबाधितांवर घरीच उपचार, 'त्या' पॉझिटिव्ह रुग्णांनाही घरीच पाठवणार

पुण्यात वाढते कोरोना रुग्ण आणि त्यासाठी आवश्यक बेड उपलब्ध नसल्याने जिल्हा....

Read more