ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटी सुसाट, पूर्ण आसन क्षमतेने धावणार, मात्र प्रवाशांना 'हे' नियम अनिवार्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 12:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटी सुसाट, पूर्ण आसन क्षमतेने धावणार, मात्र प्रवाशांना 'हे' नियम अनिवार्य

शहर : मुंबई

एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने चालवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली  असूनआजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यावेळी प्रत्येकाने मास्क वापरणे आणि हात निर्जंतुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

20 ऑगस्ट पासून राज्यभरात एसटी बसेस सुरु करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली होती. परंतु, एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवासी घेऊन प्रवास करणे बंधनकारक होते. याबाबत एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार, राज्य शासनाने प्रत्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे, निर्जंतुक करणे या अटीवर बसेसच्या पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, आज 18 सप्टेंबरपासून सर्व एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. त्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्याने एसटी वाहतूक सुरु करण्यात आली. सध्या दिवसभरात एसटीच्या सुमारे 5 हजार बसेस राज्यभरात धावत असून या बसेसद्वारे सरासरी 5 ते 6 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.

पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरु झाल्यास, भविष्यात कमी बसेसद्वारे जास्तीत जास्त लोकांची ने-आण करणे शक्य होणार आहे. मात्र, प्रवासादरम्यान प्रत्येकाने मास्क लावणे, आपले हात निर्जंतुक करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर एसटीच्या सर्व बसेस वारंवार निर्जंतुक करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसचा प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

मागे

आज इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी; निमंत्रणाचा सावळागोंधळ
आज इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी; निमंत्रणाचा सावळागोंधळ

महाविकासआघाडी सरकारकडून मुंबईच्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या....

अधिक वाचा

पुढे  

पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती
पोलिस दलात पुन्हा फेरबदल, अमिताभ गुप्ता पुणे पोलीस आयुक्तपदी, शिवदीप लांडे यांना पदोन्नती

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आ....

Read more