By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वांत मोठा पुतळा म्हणजेच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'. आणि याच पुतळ्याचा आता जगातील आठव्या आश्चर्यांमध्ये समावेश झाला आहे. तशी माहिती एस. जयशंकर यांनी त्यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
ते म्हणाले आहेत की, शांघाय को ऑपरेशन ओर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय संस्था असून त्यात भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान या देशांचा समावेश आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळा असून या पुतळ्याचा जगातील आठव्या आश्चर्याचे स्थान मिळाले असून त्याचा समावेश झाला आहे.
Received Secretary General #ShanghaiCooperationOrganization Vladimir Norov. Reviewed the progress in our cooperation as India prepares to take up the responsibility of chairing the Council of #SCO Heads of Government. pic.twitter.com/UTwZwzMUSH
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) January 13, 2020
दरम्यान, यामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून केवडियाच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. एससीओचे सदस्य राष्ट्रसुद्धा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेली माहिती सगळ्यांसाठीच महत्वपूर्ण ठरली आहे. तसेच लोकांना या माहितीवरुन पर्यटन करण्याची अधिक ओढ लागण्याची शक्यता आहे.
मुंबई- मुंबई-नागपुर समुद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहे....
अधिक वाचा