By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 06:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराने आधीच चिंताग्रस्त असतांनाचा प्रशासनाने १२ ते २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापूराच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासारखे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
गेल्या १५ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान मांडले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्ताना मदत पोहोचविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रशासणाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. गोंधळात भर पडू नये, यासाठी खबरदारी म्हणून बंदी लागू करण्यात आली आहे. आज १२ ऑगस्ट बकरी ईद सन १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर २४ ऑगस्ट ला दहीहंडी उत्सव असल्यामुळे एखाद औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन पक्ष किंवा संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एखादी अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्ट २०१९ च्या रात्री १२ वाजेपर्यंत बंदीचे आदेश जारी केले आहेत,अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संदेश शिंदे यांनी दिली.
सांताक्रूझ (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आग्रीपाडा येथे शिवसे....
अधिक वाचा