ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चिन्मयनंदांवर बलात्काराचा आरोप करणार्‍या विद्यार्थिनीला अटक

By SEJAL PURWAR | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चिन्मयनंदांवर बलात्काराचा आरोप करणार्‍या विद्यार्थिनीला अटक

शहर : देश

माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि भाजपचे नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या विद्यार्थिनीला आज खंडणी प्रकरणात एसआयटीने अटक केली आहे. मित्रांच्या साथीने चिन्मयानंद यांच्याकडे ५ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा तिच्यावर आरोप आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चिन्मयानंद यांचे लॉं कॉलेज आहे. त्याच कॉलेजतिल या विद्यार्थिनीने चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित विद्यार्थिनीने यापूर्वी या प्रकरणातिल व्हिडिओ न्यायालयात सादर केले होते. त्यामुळे चिन्मयानंद यांना एसआयटी पथकाने मुमुक्षू आश्रमातून २० सप्टेंबरला अटक केली होती. त्यानंतर चिन्मयनंद यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान मंगळवारी न्यायालयाने विद्यार्थीनीच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी घेतली होती. चिंमायानंदयांच्या वकिलांनी विद्यार्थिंनीच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आक्षेप घेतला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विद्यार्थिनीची याचिका मंजूर केली. या प्रकरणाची सुनावणी २६ सप्टेंबरला होणार आहे.

मागे

ओएनजीसी मध्ये नाफता गळती
ओएनजीसी मध्ये नाफता गळती

ओएनजीसीच्या नवी मुंबईतील प्लांटमधून नाफता गळती झाल्याने परिसरात घबराट पस....

अधिक वाचा

पुढे  

 'मिग-२१' लढावू विमान कोसळले
 'मिग-२१' लढावू विमान कोसळले

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळ हवाई दलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळले. सुदैव....

Read more