ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वर्ध्यात स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापन्यासाठी अभ्यास समिती

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वर्ध्यात स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापन्यासाठी अभ्यास समिती

शहर : मुंबई

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीस स्वच्छ भारत ही आदरांजली ठरावी यादृष्टीने वर्ध्यातील सेवाग्राम या ठिकाणी स्वच्छ भारत विश्वविद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ताऔरंगाबाद महापालिकेचे आयुक्त निपुण विनायककोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीपाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छता विभागाचे उपसचिवआयआयटीचे प्राध्यापक विरेंद्र शेट्टीसेवानिवृत्त प्राचार्य अनिल रावडॉ. अश्विनी कुमार शर्माप्राध्यापक अमोल देशमुख हे सदस्य आहेत तर विद्यापीठ शिक्षणचे उपसचिव हे या समितीमध्ये समन्वय अधिकारी असणार आहेत.

या समितीमध्ये आवश्यकतेनुसार निमंत्रित सदस्य म्हणून अन्य सदस्यांचा समावेश करता येणार आहे. ही समिती स्वच्छ भारत विद्यापीठासाठी आवश्यक पायाभूत सुविधाप्रयोगशाळाग्रंथालये याबरोबरच या विश्वविद्यापीठाचा अभ्यासक्रममनुष्यबळ यांचा अभ्यास करुन दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.

 

मागे

शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी
शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक ....

अधिक वाचा

पुढे  

आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ, अर्थसहाय्यातही वाढ
आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ, अर्थसहाय्यातही वाढ

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी....

Read more