ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची सु-30 एमकेआय विमानातून यशस्वी चाचणी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 10:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची सु-30 एमकेआय विमानातून यशस्वी चाचणी

शहर : delhi

हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्रक्षेपणास्त्राची ओदिशा तटावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. सु-30 एमकेआय विमानातून ही चाचणी घेण्यात आली. देशात प्रथमच विकसित करण्यात आलेल्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राने हवेतच लक्ष्य अचूक भेदले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ आणि हवाई दलाचे अभिनंदन केले आहे.

 

अस्त्र मिसाइलविषयी : 

  • अस्त्र मिसाइल हे एक वियोंड व्हिज्युअल रेंज (BVRAAM)ने हवेतल्या हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. म्हणजेच जेवढ्या दूरपर्यंत पायलट आपल्या डोळ्यांनी पाहू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त दूरपर्यंत असणारं निशाण हे मिसाइल साधू शकतं. लढाऊ विमानात लावण्यात आलेल्या रडारच्या मदतीने पहिला धोका ओळखला जातो. त्यानंतर रडारच्याच मदतीने निशाणा लावून क्षेपणास्त्र डागण्यात येतं. 
  • अस्त्र मिसाइल हे सर्व प्रकारच्या हवामानात अगदी अचूकपणे आपलं लक्ष्य साध्य करतो. हे मिसाइल आवाजच्या गतीपेक्षाही वेगाने म्हणजेच जवळच ४.५ मॅकच्या वेगाने हल्ला करतं. यामुळे मिसाइलपासून वाचणं हे खूपच कठीण काम आहे. 
  • इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर (ECCM) तंत्रज्ञानाच्या मदतीने हे 'अस्त्र' मिसाइल आणखी घातक होतं. या तंत्रज्ञानामुळे हे मिसाइल जॅम करणं आणि इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजरच्या मदतीने हे निकामी करणं खूपच मुश्किल आहे
  • हे मिसाइल अॅन्टी स्मोक तंत्रज्ञान लक्षात घेऊनच तयार करण्यात आलं आहे. या मिसाइलची जाडी फारच कमी आहे. त्यामुळे शत्रूला हे मिसाइल पटकन नजरेस देखील पडत नाही. 

 

मागे

नेहरू विज्ञान केंद्रात 20 सप्टेंबर रोजी ‘स्पार्कलिंग हाय व्होल्टेज डेमॉन्स्ट्रेशन’
नेहरू विज्ञान केंद्रात 20 सप्टेंबर रोजी ‘स्पार्कलिंग हाय व्होल्टेज डेमॉन्स्ट्रेशन’

मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्राने ‘स्पार्कलिंग हाय व्होल्टेज डेमॉन्स्....

अधिक वाचा

पुढे  

सिद्धीविनायक न्यासाला महापालिका देणार आरोग्यसेवेसाठी भाड्याने जागा
सिद्धीविनायक न्यासाला महापालिका देणार आरोग्यसेवेसाठी भाड्याने जागा

दादर प्रभादेवीयेथील गोखले रोडवरील जाखादेवी मंदिराजवळील आरक्षित भूखंडावर ....

Read more