By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 06:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - गेट-वे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनातलं फ्री काश्मीरचं पोस्टर आणि ते पोस्टर धरून उभी राहणारी मुलगी राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलीचं नाव मेहक प्रभू असून ती काश्मीरी वगैरे नव्हे तर मराठी आहे. मुंबईत जन्मलेली आणि वाढलेल्या मेहकनं फ्री काश्मीरचं पोस्टर का दाखवलं यावर तिचं स्पष्टीकरण. जेएनयु हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलन केले.
यावेळी एका तरुणीने 'फ्री काश्मीर' असे पोष्टर दाखविले. यावरुन जोरदार राजकारण करण्यात येत आहे. विरोधकांनी हे खपवून घेतले जाऊ नये तसेच हे पोष्टर दाखविणाऱ्यावर पोलिसांनी त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केली. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. तर आंदोलनकर्त्यांनी मुंबईत 'फ्री काश्मीर'चा बोर्ड झळकावल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.
मात्र, हा फलक दाखविणाऱ्या मुलीने याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. ती तरुणी आहे, महक मिर्झा प्रभू. आपण स्टोरीटेलर आहे. मी मराठी मुलगी आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला जगण्याचे स्वातंत्र्य हवे. काश्मीरमध्ये निर्बंध लादले गेले आहे. ते हटविले पाहिजे. त्यासाठी आपण 'फ्री काश्मीर'चा फलक हातात घेतला.
महक प्रभू हिने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने गेटवे ऑफ इंडियावर प्रदर्शन केल्यावर मी एक पोस्टर उचलले. तो त्याठिकाणी पडलेला होता. मंगळवारी ६ जानेवारीला लोकशाहीवर विश्वास असणाऱ्यांनी आंदोलन केले. मीही त्या आंदोलनात सहभागी झाले. त्याठिकाणी एक फलक पडलेला होता. त्यावर फ्री काश्मीर लिहिलेले होते. मी तो उचलला. कारण काश्मीरमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा सुरु करण्यासाठी मी यामाध्यमातून सांगायचे होते. तो तेथील लोकांचा मुलभूत स्वायत्त अधिकार आहे. मात्र, या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे.
#WATCH Mumbai: Poster reading, 'Free Kashmir' seen at Gateway of India, during protest against yesterday's violence at Delhi's Jawaharlal Nehru University. #Maharashtra pic.twitter.com/i7SeImYxCE
— ANI (@ANI) January 6, 2020
मुंबई - आज सकाळच्या सुमारास मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या शत....
अधिक वाचा