ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

शहर : नागपूर

लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वीज बिलांचा राज्यभरात अनेक नागरिकांना फटका बसला. ते बिल कमी करण्यासाठी अनेक नागरिकांना वीज महामंडळाच्या कार्यालयाच्या (एमएससीबी) खेटाही माराव्या लागल्या. मात्र, नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

लॉकडाऊनमध्ये आर्थिक उत्पन्नाची साधनं बंद झाली. त्यातच घरगुती वापराचं वीज बिल थेट 40 हजार रुपये आल्याने गायधने यांना धक्का बसला. त्यांच्या घरात कोणत्याही सामान्य घरात असावे इतकेच बल्ब आणि फॅन आहेत. मात्र, त्याचं बिल थेट 40 हजार आल्याने लीलाधर गायधने बरेच दिवस तणावात होते.

गायधने यांनी हे वीज बिल कमी करण्यासाठी वीज महामंडळाच्या कार्यालयात अनेकदा हेलपाटेही मारले. मात्र, तेथे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. उलट बिल भरल्यास घरातील वीजही खंडीत होण्याची भीती त्यांच्या मनात तयार झाली. अखेर त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली, अशी माहिती गायधने यांच्या कुटुंबाने दिली.

गायधने कुटुंबाने सांगितलं, “लॉकडाऊनमध्ये आम्हाला घराचं वीज बिल 40 हजार रुपये आलं. इतकं बिल भरणं आम्हाला शक्य नव्हतं. आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही हे वीज बिल कमी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही काळाने घरातील वीजही खंडीत होण्याची भिती निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली.”या घटनेची यशोधानगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मागे

फडणवीसांशीही बोललो, मी सांगतो, जिम ओपन करा, राज ठाकरेंनी दंड थोपटले
फडणवीसांशीही बोललो, मी सांगतो, जिम ओपन करा, राज ठाकरेंनी दंड थोपटले

महाराष्ट्रात जवळपास साडेचार महिने जिम बंद असल्याने व्यायामप्रेमी आणि जिम ....

अधिक वाचा

पुढे  

4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू
4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात बुलेटस....

Read more