By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 11, 2021 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय नौदलातील एका जवानानं INS बेतवावर गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रमेश चौधरी असं या जवानाचं नाव आहे. हा जवान मुंबईत INS बेतवावर तैनात होता. रविवारी सकाळी आपल्या सर्व्हिर रिवॉल्व्हरमधून त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचं सांगितलं जात आहे. जहाजावरच जवानाचा मृतदेह आढळून आला आणि मृतदेहाच्या बाजूलाच सर्व्हिस रिवॉल्व्हर मिळाली आहे.
नौदलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रमेश हा अविवाहित होता. रमेश चौधरीचं वय अवघं 22 वर्षे होतं. नुकताच तो सुट्टीवरुन आला होता. रमेशच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक लहान बहीण आहे. मुंबई पोलिस नौसेनेच्या मदतीनं या प्रकरणाचा तपास करत आहे. रमेश चौधरी याची आत्महत्या की हत्या आहे, याचा तपास मुंबई पोलिस आणि नौदल करत आहेत.
हत्या की आत्महत्या?
दरम्यान, मृत रमेश चौधरीच्या बाजूलाच त्याची सर्व्हिस रिवॉल्व्हर आढळून आली आहे. पण अद्याप ही आत्महत्या असल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही. पोलिस आणि नौदल मिळून पुढील तपास करत आहेत.
वर्षभरातील तिसरी घटना
दरम्यान, गेल्या वर्षभरातील ही तिसरी आत्महत्या आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये INS आंग्रेवर तैनात असलेल्या अखिलेश यादव या नौसैनिकाने गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. त्यावेळीही एक बंदूक मृतदेहाशेजारी मिळाली होती. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये लोलगू नायडू या नौसैनिकानं कुलाब्यातीलच रहिवासी वस्तीमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. तर जानेवारी 2020 मध्ये एका नौदलाच्या जवानानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. INS शिवालिकवर तैनात असलेल्या 24 वर्षीय जवानाने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आ....
अधिक वाचा