By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. प्रकल्पाचे काम सुरू करा, असे निर्देश न्यायालायनं दिले आहेत. या निर्णयामुळं मुंबई महापालिका व राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं १६ जुलै रोजी कोस्टल रोडच्या कामास मनाई केली होती. प्रकल्प राबवताना पर्यावरण विषयक परवानग्या घेतल्या नसल्याचं उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळं या प्रकल्पासाठी महापालिकेनं मिळवलेली सीआरझेडची मंजुरी न्यायालयानं रद्दबातल ठरवली होती. पर्यावरण विषयक मंजुरी मिळवून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोस्टल रोडचे काम करता येणार नाही, असं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायामूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायामूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं होतं.
Supreme Court stays the order of the Bombay High Court which quashed the Coastal Regulation Zone (CRZ) clearances granted for the southern part of the Rs 12,000 Crore coastal road project. pic.twitter.com/w41TooktDV
— ANI (@ANI) December 17, 2019
सर्वोच्च न्यायालयानं आज ही स्थगिती उठवली. त्यामुळं महापालिका प्रशासनानं यापूर्वी मिळवलेली सीआरझेडची मंजुरी प्रकल्पाच्या कामासाठी ग्राह्य ठरणार आहे. मुंबई कोस्टल रोडचा प्रकल्प तब्बल १२ हजार कोटींचा आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतील अनेक ठिकाणच्या किनाऱ्यांवर भराव टाकण्यात येणार आहे.
मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या पीएमएलए ....
अधिक वाचा