By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2020 08:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशात कोरोनाच्या वेगाने होणा-या वाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकार मार्गदर्शक सूचना (SOP) जारी करून झोपी गेले. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांची योग्य अंमलबजावणी झाली नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सर्व लोक मास्कशिवाय फिरत आहेत, सामाजिक अंतरांचे पालन करीत नाहीत आणि कुठेही थुंकतात. केंद्र सरकारचे काय चालले आहे, असा प्रश्नसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की, उल्लंघन करणार्यांवर दंड ठोठावले गेले आहेत.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, राज्य सरकार जे करत आहेत त्यात सामाजिक मेळाव्याकडे दुर्लक्षदेखील केले जात आहे. सॉलिसिटर जनरल म्हणाले की, आम्ही कोणत्याही राज्याला दोष देत नाही, परंतु कोरोना कसे टाळावे आणि समस्येचे निराकरण कसे करावे, याकडे आम्ही पाहत आहोत. सॉलिसिटर जनरलने कोर्टाला सूचित केले की, कोविडच्या नियमांचे उल्लंघन करून लोक मास्क का घालत नाहीत, यासंदर्भात राज्यांच्या सचिवांकडून दोन दिवसांत उत्तर मागवून घेतले पाहिजे. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, आपण एकत्र राज्य सरकारांना भेटले पाहिजे.
चबरोबर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये कोविड कम्युनिटी सेंटरमध्ये सेवा देण्याचे मास्क न घालणाऱ्यांना हायकोर्टाने आदेश दिला होता. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे सर्व राज्यांनी पालन केले पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
अतिसाराची समस्या रुग्णांमध्ये बळावते
एम्सचे अतिरिक्त प्रोफेसर म्हणाले की, अतिसाराची सर्वात सामान्य समस्या कोरोनाची Gastrointestinal लक्षणं आढळलेल्या रुग्णांमध्ये पाहायला मिळते, जी दोन ते 50 टक्के रुग्णांमध्ये आढळून येते. त्याच वेळी 1 ते 12 टक्के रुग्णांमध्ये 30 ते 40 टक्के लोकांमध्ये भूक नसणे, 14 ते 53 टक्के हेपेटायटिस (यकृताची जळजळ किंवा संसर्ग) आणि 3 ते 23 टक्के लोकांमध्ये आहाराच्या पचनाची समस्या असते. या सर्वांव्यतिरिक्त कोरोना रुग्णांमध्ये विषाणूचा परिणाम त्यांच्या फुफ्फुस, मेंदू, मूत्रपिंड आणि रक्तावर तसेच त्वचेवर होतो.
प्लेटलेटची संख्याही कमी होते
तसेच एम्सचे सहयोगी प्राध्यापक नीरज निश्चल यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांमध्येही प्लेटलेटची संख्या कमी असल्याचे आढळले आहे, तर काही गंभीर समस्याही दिसून आल्या आहेत. डेंग्यू आणि कर्करोगाच्या रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी होते. रक्तामध्ये प्लेटलेटची योग्य संख्या आढळणे हे निरोगी शरीराचे लक्षण आहे. त्यांची संख्या कमी झाल्यामुळे गंभीर आजार उद्भवतात.
लोकांनी काय काळजी घ्यावी?
ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, अशा लोकांमध्येही ही लक्षणे आढळू शकतात. म्हणून डॉक्टरांनी असे सांगितले की, ज्यांना जठररोगाविषयी लक्षणे आहेत आणि ज्यांना श्वसनाची समस्या आहे, अशा लोकांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करावी. जे लोक कोणत्याही कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले आणि त्यानंतर स्वत: मध्ये Gastrointestinal ची लक्षणे दिसली, अशा लोकांची देखील तातडीने कोरोना तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एकदा बूस्टर लसीचा डोस दिल्यानंतर शरीर त्याला चांगला प्रतिसाद देईल आणि लस शरीराला संरक्षण देण्यास सुरुवात करेल. रोगप्रतिकारक लस कोणत्या प्रकारची आहे हेसुद्धा आपण पाहिले पाहिजे, असंसुद्धा डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अधोरेखित केले आहे.
देशात कोरोना व्हायरस या महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना....
अधिक वाचा