By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 04:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पवन कुमार गुप्ता या दोषीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. जेव्हा गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होतो त्यामुळे फाशी देऊ नये, अशी याचिका पवन कुमारने दाखल केली होती. दिल्ली कोर्टाने हा मुद्दा दुर्लक्षित केला असंही याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. या मुद्द्यामध्ये काहीही नवीन नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
2012 Delhi gang-rape case: Supreme Court dismisses Special Leave Petition (SLP) filed by convict Pawan Kumar Gupta as the Court did not find any fresh ground in the matter. Pawan has claimed that he was a juvenile at the time of crime,& the Delhi High Court had ignored this fact. pic.twitter.com/8DrDGwSqQh
— ANI (@ANI) January 20, 2020
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात पवनकुमार गुप्ताने गुन्ह्याच्या वेळी आपण अल्पवयीन होतो अशी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेत या याचिकेला काहीही अर्थ नसल्याचं म्हटलं आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल, असा आदेश नव्याने जारी केला आहे. याआधी त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल, असे आदेश जारी करण्यात आले होते.