By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
राहुल गांधींच्या विरोधातील दुहेरी नागरिकत्वाची याचिका सुप्रिम कोर्टाकडून गुरुवारी फेटाळण्यात आली. यामुळे काँग्रेसेेचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले असून त्यांना आयोगाने निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी करण्यात येणार होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. आम्ही ही याचिका रद्द करत आहोत. कारण या याचिके तथ्य नाही, असे म्हणत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिकाकर्त्यांना चपराक दिली आहे.
कोयना नदीचे पाणी कर्नाटकाला न देता ते राज्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी म....
अधिक वाचा