ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अन्वय नाईक प्रकरणाची CBI चौकशी करा,अर्णव दोषी असल्यास तुरुंगात पाठवा,साळवेंचा युक्तिवाद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 09:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अन्वय नाईक प्रकरणाची CBI चौकशी करा,अर्णव दोषी असल्यास तुरुंगात पाठवा,साळवेंचा युक्तिवाद

शहर : देश

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम  जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती  चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामी आणि इतर दोघांना 50 हजार रुपयांच्या हमीवर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायने रायगड पोलिसांना दिले आहेत. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला आहेत. हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींविरुद्धची एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

आजच्या सुनावणीतील 10 प्रमुख मुद्दे

1 ‘अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईचा खून केला, अशी यापूर्वीची नोंद हरिश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात वाचून दाखवली.

2. हरिश साळवेंनी महाराष्ट्र विधानसभेतील चर्चेचा संदर्भ दिला. तीन वर्ष जुन्या एफआयआरमध्ये अर्णव गोस्वामींना अटक करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक केली आणि तळोजा जेलमध्ये हलवलं, असा युक्तिवाद हरिश साळवेंनी केला.

3. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवा आणि अर्णव गोस्वामी दोषी असेल तर त्याला तुरुंगात पाठवा, असंही हरिश साळवे म्हणाले.

4. अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन दिला तर आभाळ कोसळणार आहे का? हा प्रश्न हरिश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला.

5. अर्णव गोस्वामींचे चॅनेल कधीही पाहिले नाही, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान हे वक्तव्य केले.

6. ‘न्यायालयानं आज हस्तक्षेप केला नाहीतर आपण विनाशाकडे जावू, हे मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केलं.

7. ‘मागील महिन्यात एका व्यक्तीनं महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी पगार केला नाही म्हणत आत्महत्या केली, आपण काय करणार, मुख्यमंत्र्यांना अटक करणार का?’ असा, युक्तिवाद हरीश साळवेंनी केला.

8. कपिस सिब्बल यांनी उद्यापर्यंत थांबा, सत्र न्यायालयानं जामीन नाही दिला तर सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा, असा युक्तिवाद केला.

9. अर्णव गोस्वामी दहशतवादी आहेत का? 20- 30 पोलिसांनी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं? असा सवाल हरीश साळवेंनी उपस्थित केला.

10. मुंबई उच्च न्यायालयानं अर्णव गोस्वामींचा अंतरिम जामीनासाठीचा अर्ज नामंजूर करणं ही चूक होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं.

नीतिश सारडा आणि फिरोझ शेख यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सकाळी 11 वाजता सुरु झालेली सुनावणी 4.15 पर्यंत सुरु होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले. मुंबई हायकोर्ट व्यक्तीच्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले, असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी चौकशीसाठी रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामींना 4 नोव्हेंबरला अटक केली होती. अलिबाग सत्र न्यायालयानं अर्णव गोस्वामींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयानं गोस्वामींचा अर्ज फेटाळून लावत सत्र न्यायालयात अर्ज दाखल कऱण्याचे निर्देश दिले होते.

मागे

तब्बल 8 दिवसांनंतर अर्णव गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका
तब्बल 8 दिवसांनंतर अर्णव गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका

तब्बल 8 दिवसांनंतर अर्णव गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली आ....

अधिक वाचा

पुढे  

"आज न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही, तर आपण विद्ध्वंसाच्या मार्गावर जाऊ" : न्यायमूर्ती चंद्रचूड

सर्वोच्च न्यायालयाने इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्ये प्रकरणात रि....

Read more