ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या गाईडलाईन्ससाठी समिती बनवा- सुप्रीम कोर्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 10:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या गाईडलाईन्ससाठी समिती बनवा- सुप्रीम कोर्ट

शहर : देश

सुप्रीम कोर्टाने एका चॅनलच्या वादग्रस्त शोच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या गाईडलाईन्ससाठी सदस्यीय समिती बनवण्यात यावी, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मीडियाच्या भूमिकेवर विचार करून सल्ला देण्यासाठी सदस्यांची समिती बनवावी. या समितीचं अध्यक्षपद सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश किंवा हायकोर्टाचे माजी चीफ जस्टीस यांनी करावी, असा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

मीडियाचं स्वातंत्र्य निरंकुश असू शकत नाही, यासाठी काही नियम बनवणं गरजेचं आहे. परदेशी संघटनेच्या कथित षडयंत्राबाबत बातमी चालवणं वेगळी गोष्ट आहे, पण एखादा संपूर्ण समाज षडयंत्रात सामील आहे, असं म्हणणं चुकीचं असल्याचं परखड मत सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे.

सुप्रीम कोर्टाने या चॅनलच्या कार्यक्रमात तथ्यामध्येच चुका असल्याचं म्हणलं आहे. मुस्लिमांचं वय ३५ वर्ष ठेवणं आणि परीक्षांसाठी जास्त संधीचा चुकीचा दावा करण्यात आला आहे. कार्यक्रमातून मुस्लिमांना निशाणा करण्यात आलं, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. चॅनलच्या वकिलांनी हा कार्यक्रम शोध पत्रकारिता असल्याचा दावा केला, पण हा कार्यक्रम वैमनस्य आणि समाजात फूट पाडणारा असल्याचं सुप्रीम कोर्ट म्हणालं.

केंद्र सरकारने सप्टेंबरला या कार्यक्रमाच्या प्रसरणाला परवानगी दिली होती, यानंतर ११ आणि १४ सप्टेंबरला दोन भाग प्रसारितही करण्यात आले. याप्रकरणाची पुढची सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे, तोपर्यंत या कार्यक्रमाचं प्रसारण होणार नाही.

मागे

पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू
पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू

पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये आजपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येण....

अधिक वाचा

पुढे  

आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट
आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट

भारतीय रेल्वेने  (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय....

Read more