ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डोंबिवलीकरांच्या ट्रेनच्या समस्या, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत आवाज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डोंबिवलीकरांच्या ट्रेनच्या समस्या, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत आवाज

शहर : मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीच्या लोकल ट्रेनच्या समस्या लोकसभेमध्ये मांडल्या. काहीच महिन्यांपूर्वी डोंबिवली ते सीएसएमटी ट्रेन सुरु करण्यात आली होती. पण ही ट्रेन कल्याणवरून येते, त्यामुळे ट्रेनला गर्दी होते. कल्याणवरुनच प्रवासी बसून येत असल्यामुळे डोंबिवलीकरांना ट्रेन डोंबिवलीवरून सुटणारी असली तरी बसायला मिळत नाही. हा मुद्दा सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडला.

रेल्वे अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ट्रेनच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबतही सुप्रिया सुळे लोकसभेत बोलल्या. तसंच डोंबिवलीवरून जास्त ट्रेन सोडण्यात याव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

मागे

वनविभागाणे बिबट्याला केले जेरबंद!
वनविभागाणे बिबट्याला केले जेरबंद!

औरंगाबाद शहरात सिडकोतील एन वन परिसराजवळ असलेले उद्यानात मंगळवारी सकाळी बि....

अधिक वाचा

पुढे  

माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला, पक्ष सोडण्याच्या वृत्तावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रीया
माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला, पक्ष सोडण्याच्या वृत्तावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रीया

भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या ए....

Read more