ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अबब ! एक व्यक्ति, 3 सरकारी नोकर्‍या, 30 वर्षे, तीन पगार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अबब ! एक व्यक्ति, 3 सरकारी नोकर्‍या, 30 वर्षे, तीन पगार

शहर : patna

सरकारी नोकरी मिळावी म्हणून अनेक जण जीवाचा आटापिटा करतात. सरकारी नोकरी मिळविणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. त्यासाठी कित्येक जण लाखो रुपये देवून फसतातही या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये  गेल्या 30 वर्षात एकच व्यक्ती सुरेशराम गेली 30 वर्षे तीन वेगवेगळ्या पदावर काम करून त्या तिन्ही ठिकाणचे वेतनही घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या संदर्भात मिळालेलेली माहिती अशी की, सुरेशकुमार एकाच वेळी किशन गंज येथळ बांधकाम विभागाचे कार्यालय, जलसंधारण विभागाच्या बांका आणि भीमनगर येथील कार्यालयांमध्ये सहायक अभियंता पदावर नोकरी करीत होता. 1988 मध्ये सुरेशराम पाटणा येथील बांधकाम विभागात कनिष्ट अभियंता म्हणून कामाला लागला होता. याच दरम्यान त्याला जलसंधारण विभागातील नोकरीचा प्रस्ताव चालून आला. हा प्रस्ताव ही त्याने स्वीकारला. महत्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही ठिकाणी नोकरी करताना त्याला बढतीही मिळत होती. 30 वर्षे हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही, याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, सरकारकडून पगाराचा हिशोब ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सीएफएमएस या नव्या प्रणालीमुळे सुरेशची पोलखोल झाली. त्याचावर तिन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो फरार असल्याचे कळते.

 

मागे

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील पारणेर तालुक्यात गुणेरे येथील बाबाजी बढे (30) त्यंची पत्....

अधिक वाचा

पुढे  

22 भ्रष्ट आयकर अधिकार्‍यांना सक्तीची सेवानिवृती
22 भ्रष्ट आयकर अधिकार्‍यांना सक्तीची सेवानिवृती

भ्रष्टाचार आणि गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि अ....

Read more